वाघोली – वाघोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चाने वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ सेल्फी पॉइंट उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातून शिवभक्त वाघोली येथे दर्शनासाठी वर्षभर येत असतात. वाघेश्वर देवस्थानच्या वतीने व वाघोली ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून हा परिसर विकास कामांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. वाघोली ची नव्याने ओळख सिद्ध करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या सेल्फी पॉइंटची उभारणी करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी घेतला होता त्यानुसार पुणे अहमदनगर रस्त्यालगत वाघेश्वर मंदिराच्या भोवती सेल्फी पॉइंट ची उभारणी करण्यात आली आहे.
आगामी काळात देखील वाघोलीच्या वैभवात भर पडणाऱ्या बाबी निश्चितपणे करण्यात येणार असल्याचे महेंद्र भाडळे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासून सेल्फी पॉइंट ची उभारणी करून गावाच्या वैभवात भर टाकली असल्याचे मत माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील,माजी सरपंच जयश्री सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच शांताराम कटके, कैलास सातव पाटील, सुधीर भाडळे,समीर भाडळे, रामकृष्ण सातव पाटील, दत्तात्रेय कटके, सुनील जाधवराव, संतोष तांबे, प्रमोद भाडळे, सागर जाधव, निखिल भाडळे, भारत सातव, सुशील जाधव, सागर भाडळे, विकास शिंदे, राजेश वारघडे, चैतन्य सातव, विनोद सातव, लखन भाडळे, राजेंद्र भाडळे, नानासाहेब भाडळे, संभाजी भाडळे, अजित सातव यावेळी वाघेश्वर तरुण मंडळ व महेंद्र भाडळे मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
महेंद्र भाडळे यांनी राबवलेल्या उपक्रम वाघोलीच्या वैभवात भर टाकणारा आहे.
– अशोक पवार, आमदार
वाघोली मध्ये आधुनिकतेची संकल्पना राबवून महेंद्र भाडळे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. – सुनील टिंगरे, आमदार