शिक्रापूर-जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यरतरीय खो खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असून या विद्यालयातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय खो खो स्पर्धसाठी झाली असल्याची माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.
महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी झाले होते. पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करताना विद्यालयाने नागपूर, औरंगाबाद, नाशिक विभागावर विजय संपादन केला. त्यानंतर श्रीनगर (जम्मू काश्मिर) या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी विद्यालयातील शिवराम शिंगाडे व अनिकेत जाधव या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघास राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रमोद काळे, कांतीलाल धुमाळ, धीरज दंडवते यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सुगंध उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.