सातारा, (प्रतिनिधी) – देशभरातील 11 कोटींपेक्षा जास्त ग्राहक असलेल्या हिरो मोटोकॉर्पने आपल्या 125 सीसी सेगमेंटमध्ये सर्वात पॉवरफुल आणि स्टायलिश असलेली ‘एक्सट्रीम 125 आर’ ही बाइक नुकतीच बाजारात आणली आहे. या बाइकचे अनावरण गुरुवारी (दि. 14) महाराष्ट्रात करण्यात आले.
हिरोचे सातारामधील अधिकृत विक्रेते सम्राट हिरोमध्ये या गाडीचे अनावरण युवा उद्योजक अर्जुन मोने, सम्राट हिरोचे मालक कुशल त्यागी, ग्राहक आणि विविध बँकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.
या नवीन एक्सट्रीम 125 आर बाइकचे लूक्स स्पोर्टी असून, हिरो मोटोकॉर्पने नवीन तंत्रज्ञानयुक्त आधुनिक स्प्रिंट ईबीटी टेक्नोलॉजी असलेले इंजिन दिले आहे. एलईडी आणि प्रोजेक्टर लाइटस्, डिजिटल मीटर कॉन्सोल, ज्यामध्ये गियर इंडिकेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिल्याने गाडी डायनॅमिक वाटते, तसेच हँडलिंगसुद्धा अत्यंत सोपे आहे.
अत्यंत मजबूत असणारे 37 एमएम डायमीटरचे फ्रंट सस्पेन्शन दिले आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून, एक्सट्रीम 125 आरमध्ये 276 एमएमचा फ्रंट डिस्क ब्रेक ‘एबीएस’सह दिला आहे. मागील बाजूस सेव्हन स्टेप अॅडजस्टेबल मोनो सस्पेन्शनमुळे गाडी आरामदायी राइड देते. स्प्लिट सीटमुळे रायडर व मागे बसणार्या व्यक्तीला कम्फर्ट जाणवणार आहे.
मागील टायर मोठा व रुंद दिल्याने सर्व प्रकारच्या रस्त्यांवर चांगली ग्रिप मिळणार आहे. मागील चाकाला स्पोर्टी कव्हर दिल्याने सुरक्षितता वाढली आहे. या गाडीचे दोन व्हेरिएंट असून, आयबीएस आणि एबीएस प्रकारात गाडी उपलब्ध आहे. फायरस्टॉर्म रेड, कोबाल्ट ब्लू, स्टॉलिन ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये एक्सट्रीम 125 आर सम्राट हिरोमध्ये उपलब्ध आहे.
आयबीएस मॉडेलची किंमत 95 हजार 287 रुपये एक्स शोरूम आणि एबीएस मॉडेलची किंमत 99 हजार 999 रुपये एक्स शोरूम आहे. गाडी खरेदीसाठी आकर्षक बँक लोन सुविधा आहेत. ग्राहकांनी एक्सट्रीम 125 आरच्या टेस्ट राइडसाठी आणि अधिक माहितीसाठी सम्राट हिरोमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.