माळेगाव (वार्ताहर) – माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची शेफलर इंडिया या अग्रेसर कंपनीमध्ये निवड झाली आहे. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधीक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे.
मागील चार वर्षांमध्ये १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महाविद्यालयामार्फत नोकरीची संधी मिळालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नव-नवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते.
याचाच परिपाक म्हणून महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांची इलेक्ट्रॉनिक्स व ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शेफलर इंडिया कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया ही अंतिम वर्षाच्या प्रोजेक्टवर आधारित क्रियाकलापद्वारे करून झाली. या निवड प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉमिनिकेशन विभागातील ११ व कॉम्प्युटर विभागामधील ६ असे १७ विद्यार्थ्यां यशस्वी झाले. महाविद्यालयातील पौर्णिमा गाडेकर, अरबाज शेख, किरण हजारे,
तुषार जगताप, तेजस्विनी तावरे, यश बोराटे, प्राची कदम, तेजस्विनी लकडे, स्वप्नील पार्लेकर, संकेत भांबोरे, रामेश्वर गोसावी, श्रुतिका शितोळे, श्वेता बोबडे, प्रतीक्षा भापकर, विजय निंबाळकर, सायली कट्टे, कोमल कदम या विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये समावेश झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ६ लाख वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार आहे.
महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस.एम .मुकणे डॉ. निता दोशी व विभाग प्रमुख डॉ. युवराज परकाळे व डॉ. योगिता सिनकर यांनी विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव कारखान्यांचे अध्यक्ष केशवराव जगताप व संचालक मंडळ विश्वस्त रवींद्र थोरात, वसंत तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते व निमंत्रित सदस्या सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी अभिनंदन केले.