रांची – कोलकत्याविरूद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. धोनीची पत्नी साक्षी रावत यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कमेंट करत ही धमकी दिली होती.
या धमकीनंतर रांची पोलीस सक्रिय झाले आहेत. धोनीच्या सिमलिया येथील
फार्महाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच सिमलिया परिसरात पोलीसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.
https://twitter.com/AdarshK67323175/status/1314760144438194176
धमकी देणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल असे ग्रामीण एसपी नौसाद आलम म्हणाले आहेत.
साक्षी रावत यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धमकी दिल्यानंतर देशभरातून अनेकांनी राग व्यक्त केला आहे.