पीएम मोदींनी लाॅन्च केली ‘स्वामित्व योजना’, महाराष्ट्रातील 100 गावांना मिळणार लाभ

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे ‘स्वामित्व योजना’ लाॅन्च केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागाचं रूप पालटण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत जमिनीच्या मालकांना प्राॅपर्टी कार्ड मिळणार असून सुरूवातीच्या टप्प्यात 6 राज्यातील तब्बल 673 गावंमध्ये प्राॅपर्टी कार्ड वितरित केले जाणार आहे.

एकून 1 लाख 32 हजार प्राॅपर्टीधारकांना याचा लाभ मिळणार असून महाराष्ट्राला येत्या महिनाभरात प्राॅपर्टी कार्ड मिळणार आहे.

या योजनेनुसार जमीनधारकांना त्यांच्या मालमत्तेचा वापर बॅंक कर्ज घेण्याबरोबरच इतरही आर्थिक लाभ घेण्यासाठी करता येऊ शकतो. ही योजना पंचायत राज मंत्रालयाकडून पुढील 4 वर्ष राबवली जाणार आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी केली होती.

पहिल्या टप्प्यात या योजनेचा 6 राज्यांतील 673 गावातील नागरिकांना लाभ
मिळणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 347, हरियाणातील 221, महाराष्ट्रातील 100, उत्तराखंड येथील 50, मध्य प्रदेशातील 44 तर कर्नाटक मधील 2 गावांचा समावेश आहे.

सुरूवातीला जमीन मालकाच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे लिंक पाठवण्यात याणार आहे. त्यावरून हे प्राॅपर्टी कार्ड डाऊनलोड करता येईल. त्यानंतर राज्य सरकारकडून प्राॅपर्टी कार्डचं वितरण करण्यात येणार आहे.

स्वामित्व योजनेविषयी महत्वाचे 3 मुद्दे –

1 ग्रामीण भागातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी स्वामित्व योजना हाती घेण्यात आली आहे.

2 ड्रोनद्वारे सर्व गावांची मोजनी होऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून गावातील लोकांना प्राॅपर्टी कार्ड देण्यात येणार आहेत.

3 जमीनधारक त्यांच्या मालमत्तेचा वापर बॅंक कर्ज घेणे, तसेच इतरही आर्थिक
लाभ घेण्यासाठी करू शकणार आहेत.

पाहा संपूर्ण काॅन्फरंस – https://twitter.com/narendramodi/status/1315167699190702083

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.