मुंबई – ‘कांतारा’ चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथेसह, व्हिज्युअल्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सने दर्शकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाला अधिक यश मिळत आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘कांतारा’ चित्रपट जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून ‘ऑस्कर’ 2023 साठी नामांकन म्हणून देखील पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, अश्यातच या चित्रपटाबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आली असून या चित्रपटाचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नुकत्याच एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत विजय आणि चालुवे यांनी ‘कंतारा’च्या दुसऱ्या भागाबद्दल सांगितलं आहे.
‘कांतारा 2′ नक्की बनवणार असल्याचं त्याने यावेळी स्पष्ट सांगितलं आहे, पण त्याची डेडलाइन निश्चित नाही. तसेच, आम्ही इतर गोष्टींमध्ये व्यस्त होतो आणि ऋषभनेही महिनाभर ब्रेक घेतला. तो परत येताच आम्ही फ्रँचायझीसाठी आमची पुढची पायरी ठरवू शकू’ असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिनेरसिकांना ‘कांतारा 2’ नक्की पाहायला मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, ‘कांतारा’चे कन्नड व्हर्जन आणि हिंदी व्हर्जन 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाले. तसेच, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा निर्मित, या चित्रपटात ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा आणि किशोर कुमार मुख्य भूमिकेत आहेत.