नव्या करोनाचा धसका! मुंबईतील शाळा, महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद

मुंबई – ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शाळांबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत ठेवण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे.

याआधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूच्या नव्या अवताराच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.