school teacher : उत्तर प्रदेश सरकार राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांच्या (school teacher) बदली प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. राज्यातील परिषद शाळांमधील शिक्षकांना आता त्यांच्या पसंतीच्या शाळेत नियुक्ती मिळण्यासाठी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बदली साठी शिक्षकांना संगणक चाचणी द्यावी लागेल.
सध्या उत्तर प्रदेश येथील अनेक जिल्ह्यांमध्ये या परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होऊ शकते. वरिष्ठ शिक्षकांची निवड करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच ही परीक्षा उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे.
राज्यातील २४ हजार संमिश्र शाळांमध्ये शिक्षक निवडीसाठी संगणकावर आधारित चाचणीही घेण्यात येणार आहे. दरवर्षी या परीक्षेद्वारे इच्छित बदलीसाठी शिक्षकांची निवड केली जाईल. सध्या राज्यातील १.३९ लाख परिषद शाळांमध्ये ४.५५ लाख शिक्षकांची नियुक्ती आहे. विभागाकडून शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
जिल्ह्यांमध्ये संगणक आधारित चाचण्यांसाठी लवकरच एजन्सी निवडली जाईल. निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
दरम्यान, या विषयी बोलताना शालेय शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी सांगितले होते की, शाळांमध्ये चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या कलागुणांचा वापर करून शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी ठोस यंत्रणा तयार करण्यात येत आहे. असं ते म्हणाले होते.