सुप्रिम कोर्टाच्या रजिस्ट्रीत गैरव्यवहार; न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीत काहीं गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयातील प्रशासन व्यवस्थेचे प्रमुख या नात्याने सरन्याधिश रंजन गोगोई यांनी या प्रकारांकडे लक्ष देण्यासाठी दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि सीबीआयचे वरीष्ठ अधिकारी तेथे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या विविध खंडपीठातील याचिकांच्या तारखांची आदलाबदल करून तेथे वशिलेबाजी केली जाते.

काहीं याचिका अन्य याचिका दूर सारून सुनावणीसाठी पाठवल्या जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होतात अशा तक्रारी आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे सीबीआयने या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आपले वरीष्ठ अधिकारी येथे डेप्युटेशनव पाठवावे अशी सुचना न्यायालयाने केली आहे. सरन्यायाधिशांनी तशीच सुचना दिल्ली पोलिसांनाही केली आहे.

एका उद्योगपतीची केस आधी सुनावणीला घेण्यासाठी आधीच्या काही याचिकांच्या तारखांमध्ये फेरबदल केल्याच्या कारणावरून सरन्यायाधिशांनी अलिकडेच रजिस्ट्री मधील दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. न्यायालयात अनुकुल तारखा मिळवून देण्यासाठी या परिसरात दलाल फिरत असल्याची तक्रार उत्सव बैंस नावाच्या वकिलाने न्यायालयात केली होती. त्यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधिशांनी एक सदस्य समिती स्थापन केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधिश ए. के पटनाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.