विम्बल्डन टेनिस स्पर्धा : अॅलिसनकडून अग्रमानांकित बार्टी पराभूत

विम्बल्डन – अमेरिकेच्या अॅलिसन रिस्की हिने अग्रमानांकित ऍशलीघ बार्टी हिच्यावर मात करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय मिळविला. महिलांमध्ये शुई झेंग (चीन) व एलिना स्वितोलिना (युक्रेन ) यांनीही चौथ्या फेरीत शानदार विजय मिळविला.

रिस्की हिने बार्टीवर 3-6, 6-2, 6-3 असा विजय नोंदविला. पहिल्या सेटमध्ये बार्टीने सुरेख खेळ केला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रिस्कीने परतीचे फटके व सर्व्हिस यावर योग्य नियंत्रण ठेवले. तसेच तिने व्हॉलीचा क्‍ल्पकतेने उपयोग केला. बार्टीला सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. स्वितोलिनाने विजयी वाटचाल राखताना क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिक हिचे आव्हान 6-4, 6-2 असे संपुष्टात आणले. तिने वेगवान पासिंग शॉट्‌सचा उपयोग केला. तिने अचूक सर्व्हिसही केल्या.

झेंगने युक्रेनच्या डायना येस्त्रेमस्का हिचा 6-4, 1-6, 6-2 असा पराभव केला. भारताच्या रोहन बोपण्णा व दिविज शरण या दोन्ही खेळाडूंना मिश्रदुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. बोपण्णा व बेलारूसची एरिना सॅबेलान्का यांना आर्लेम सितेक (न्यूझीलंड) व लॉरा सिगेमुंड (जर्मनी) यांनी 6-4, 6-4 असे हरविले. शरण व चीनची यिंगयिंग दुआन यांना इंग्लंडच्या एडन सिल्वा व इव्हान होयाट यांनी 6-3, 6-4 असे पराभूत केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.