सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या कसोटी लढतीत इंग्लंडचा १०७ धावांनी पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या कसोटीत एकूण १२९ धावा करणारा व ८ झेल घेणारा क्विंटन डी काॅक सामन्याचा मानकारी ठरला.
Quinton de Kock takes home the Man of the Match award 🏆 for his riveting performance that spearheaded the win for SA
Which of his performances impressed you the most?
🏏 129 runs
🧤 8 catches in the matchHmmm… tough one 🤔 pic.twitter.com/RAcpPRhtOU
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 29, 2019
दक्षिण आफ्रिकेने दुस-या डावात सर्वबाद २७२ धावा करून पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी ३७६ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडला दुस-या डावात सर्वबाद २६८ धावांच करता आल्याने त्यांना १०७ धावांनी पराभव पत्कारावा लागला.
दुस-या डावात इंग्लंडकडून सलामीवीर राॅरी बर्न्सने ८४, जो रूटने ४८, जो डेनली ३१ आणि डोमिनिक सिबली यांनी २९ धावांची खेळी करत थोडाफार प्रतिकार केला पण ते सामना वाचवू शकले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ४ तर ऐनरिक नाॅर्टजेने ३, केशव महाराजने २ आणि ड्वेन प्रीटोरियसने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद २८४ धावा केल्या होत्या. यात क्विटंन डी काॅकने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फिलँडरच्या ४, कगिसो रबाडाच्या ३, ऐनरिक नाॅर्टजेच्या २ आणि प्रीटोरियसच्या १ बळीच्या जोरावर इंग्लंडला अवघ्या १८१ धावांत गुंडाळत १०३ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती.
मालिकेतील दक्षिण आफ्रिका-इंग्लंड दरम्यानचा दुसरा सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान केपटाऊन येथे होणार आहे.