महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची पाचव्या दिवशीही कारवाई जोरात
नगर – महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमण हटाव मोहिमेने जोरधरला असून, सोमवारी (दि.18) रोजी पथकाने सावेडी उपनगराकडे मोर्चा वळविला असून, प्रोफेसर कॉलनी ते भिस्तबाग चौक तसेच पाईपलाईन रसत्यावरील अतिक्रमणे काढली.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून बुधवारपासून शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली आहे. माळीवाडा रस्ता, कापडबाजार, बंगाल चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, कोठला परिसर, चितळेरोड येथील अतिक्रमणे काढण्यात आल्यानंतर आज सकाळी दहा वाजता सावेडी उपनगरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
मनपा अतिक्रमण विरोधी विभागप्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईत हातगाड्या, रस्त्याच्या कडेला सुरू करण्यात आलेली दुकाने हटविण्यात आली असून पत्र्याच्या टपऱ्या, ओटे काढण्यात येत आहेत. ही कारवाई सतत चालु राहणार असल्याने अतिक्रमणाधारकांचे धाबे दणाणले आहेत.