नवी दिल्ली – कोविड टाळण्यासाठी तोंडावर मास्क लावणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखू शकतो हे सातत्याने सांगितले जाते आहे. पण आता तज्ञांनी डबल मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञ म्हणतात की, ट्रान्समिशन थांबविण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय आहे.
दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध विभागाचे संचालक डॉ. रोमेल टिकू यांच्या म्हणण्यानुसार, करोना संसर्ग टाळण्यासाठी सर्जिकल मास्क आणि कपड्याचा मास्क किंवा दोन कपड्यांचा मास्क घालू शकता. तथापि, N95 मास्क घातल्यास दोन मास्कची गरज लागणार नाही.
डॉ. रोमेल टिकू यांनी म्हटले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी जात असते, जेथे सोशल डिस्टन्सिंग शक्य नसते. त्यावेळी त्यांना डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डबल मास्क घालून संक्रमित व्यक्तीच्या जवळून गेलात तरी ड्रॉपलेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते.