धक्कादायक! पोलीस काॅन्स्टेबलची गोळी झाडून आत्महत्या

मुजफ्फरनगर –  पोलीस काॅन्स्टेबलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये घडली आहे. ही घटना सोमवारी (ता.12) सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली. याघटनेमुळे मुजफ्फरनगर पोलीस दलात एकच खळबळ उडालीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल कपासिया (वय-24, मुळ रा. किशनपूर, बुलंदशहर) असे आत्महत्या केलेल्या काॅन्स्टेबलचे नाव आहे. ते मुजफ्फरनगर येथील मंडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी सोमवारी सकाळी राहत असलेल्या खोलीत बंदूकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरमालक खोलीजवळ पोहोचले तेंव्हा अखिल हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर पोलीसांना माहिती देण्यात दिली.

घटनेची माहिती मिळताच सीओ हिमांशु गौरव, पोलीस निरीक्षक अनिल कपरवान, पोलीस निरीक्षक सुशील सैनी यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अखिल कपासिया यांनी आत्महत्या का केली याप्रकरणी अधिक तपास मुजफ्फरनगर पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.