रियाध: कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी जी -20 नेत्यांना प्रभावी आणि समन्वित कारवाई करावी आणि विकसनशील देशांना मदत करण्याचे आवाहन सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी गुरुवारी केले. अमेरिकेसह काही श्रीमंत देशांनी मोठे पॅकेज घोषित केले आहे, परंतु “जी -20′ कडून आतापर्यंत कोणतीही सामूहिक कृतीची योजना बनवली गेलेली नाही यावर आणि सामूहिक कृतीसाठी केल्या गेलेल्या आवाहनावर श्रीमंत देशांकडून मिळालेल्या संथ प्रतिसादावरही राजे सलमान यांनी टीका केली गेली आहे. “जी-20′ गटाच्या प्रमुख नेत्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज चर्चा केली. त्या चर्चेच्या प्रारंभी सौदीचे राजे सलमान यांनी आपली भूमिका विशद केली आहे.
कोरोनाच्या साथीने जागतिक अर्थव्यवस्था, वित्तीय बाजारपेठा, व्यापार आणि जागतिक पुरवठ्याच्या साखळ्यांना धोक्यात आणले आहे. या साथीच्या रोगाचा आम्हाला प्रभावी आणि समन्वित प्रतिकार केला पाहिजे आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास परत मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले.
भांडवली बाजारपेठेकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि पुरेशा आरोग्य सुविधा नसल्यामुळे गरीब देशांची चिंता वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कर्जवसुली थांबवण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेने “जी -20′ देशांच्या सरकारांना करण्यात आले आहे. त्या आवाहनाला समर्थन द्यावे असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेने म्हटले आहे.