वडूज (प्रतिनिधी) : करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. आणि यामध्ये समाविष्ट असणाऱ्या किराणा दुकानमालक जास्त दराने मालाची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार वडूज (ता. खटाव) येथे समोर आला.
खटाव तहसीलदार डाॅ. अर्चना पाटील यांनी यांच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित दुकानाची पाहणी करावी तसेच सत्यता पडताळून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार वडूज येथील वैभव ट्रेडिंग या दुकानाचे मालक श्री गांधी बंधूवर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.