करोनामुक्तीचा आकडा 1012 वर
कराड (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी करोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 45 करोनामुक्त रूग्णांमुळे येथील करोनामुक्तीचा आकडा आज 1012 इतका झाला आहे. करोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या वैद्यकीय सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यात करोनाचा कहर झाला आहे. मोठ्या संख्येने करोनाबाधित रूग्ण वाढत असतानाच कृष्णा हॉस्पिटलने करोनामुक्तीसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व ठरत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या करोना विशेष वॉर्डमध्ये सुरू झालेल्या उपचारांमुळे दि. 18 एप्रिल रोजी पहिल्या करोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस करोनामुक्तीचा आकडा वाढत आज कृष्णा हॉस्पिटलने करोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण करत 1012 इतका आकडा पार केला आहे.
मंगळवारी 45 करोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. करोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विनायक राजे, कविता कापूरकर, मनसेचे दादा शिंगण व माध्यम प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील चोरे येथील 69 वर्षीय महिला, रविवार पेठेतील 51 वर्षीय महिला, कापील 47 वर्षीय पुरुष, कार्वे 55 वर्षीय महिला, मलकापूर 30 वर्षीय पुरुष, कराड 62 वर्षीय महिला, पाटण 29 वर्षीय महिला, सोमवार पेठेतील 50 वर्षीय महिला, शनिवार पेठेतील 22 वर्षीय महिला, पार्ले 65 वर्षीय महिला, आगाशिवनागर 70 वर्षीय पुरुष, मलकापूर 65 वर्षीय पुरुष, शामगाव 35 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 46 वर्षीय पुरुष, सैदापूर 29 वर्षीय पुरुष, रुक्मिणीनगर 38 वर्षीय महिला, शुक्रवार पेठेतील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष, विद्यानगर 22 वर्षीय पुरुष, पोतले 50 वर्षीय पुरुष, मलकापूर 54 वर्षीय पुरुष, सोमवार पेठेतील 45 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटलमधील 25 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष,
वाठार 21 वर्षीय महिला, बुधवार पेठेतील 41 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनीतील 50 वर्षीय पुरुष, गोटे 62 वर्षीय महिला, गुरुवार पेठेतील 67 वर्षीय महिला, इंदोली 31 वर्षीय महिला, गुरुवार पेठेतील 54 वर्षीय महिला, 73 वर्षीय महिला, आगाशिवनागर 21 वर्षीय महिला, शेरे 70 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शिबेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, पाटण 35 वर्षीय पुरुष, कोल्हापूरची 45 वर्षीय महिला, राजारामपुरी 36 वर्षीय महिला, कोल्हापूर 16 वर्षीय युवती, इस्लामपूर तालुक्यातील कासेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, कल्याण (ठाणे) 43 वर्षीय महिला, सांगली आंबेडकरनगर येथील 54 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 45 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवती यांचा समावेश आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. अशा वेळी जास्तीत जास्त करोनाबाधित रूग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी कृष्णा हॅस्पिटलने सर्व सज्जता ठेवली आहे. लक्षणे जाणवताच करोनाची चाचणी करून तातडीने उपचार घेतल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. यासाठी सर्वांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.