पुसेगाव – वर्धा येथे बुधवार, दि. 3 रोजी होणार्या राज्यस्तरीय शालेय थांग ता स्पर्धेसाठी बुध, ता. खटाव येथील श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या राधिका संतोष बोराटे (इयत्त आठवी) हिची निवड झाली आहे. तिने विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले निवड झाली आहे.
या निवडीबद्दल राधिकाचा प्राचार्य अंकुश भांगरे, सरपंच सौ. सुजाता बोराटे, उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, माजी प्राचार्य शेखर घाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तिला अजित पाटील आणि विद्यालयाचा माजी विद्यार्थी पारस पवार प्रा. दातात्रय काळुखे, नाना दडस यांचे मार्गदर्शन लाभले. पत्रकार प्रकाश राजेघाटगे, विनोद गोडसे, अजित चव्हाण, भगवान सरवदे, संजय माने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.