सातारा: जिल्ह्यातील आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती

सातारा – राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदली प्रक्रियेला सुरवात झाली आहे. राज्यातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती दिल्याचे आदेश पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी मंगळवारी काढले.

यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षकांचे वाचक गजानन कदम यांची नवी मुंबई, महिला शाखेच्या माधुरी जाधव ठाणे शहर, रहिमतपूरचे घनश्‍याम बल्लाळ, नियंत्रण कक्षाचे उत्तम भजनावळे यांची मुंबई शहर, लोणंदचे संतोष चौधरी यांची मीरा-भाईंदर, पुसेगावचे विश्वजित घोडके यांची गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे, फलटण तालुक्‍यातील बरड दूरक्षेत्राचे प्रशांत नागटिळक यांची मुंबई शहर, सातारा शहरचे विजय घेरडे यांची लोहमार्ग, औरंगाबाद येथे पदोन्नतीने बदली झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.