सातारा -जिल्हा कोविड हॉस्पिटलचे आज मुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. आता हॉस्पिटल निर्जंतुकीकरण करण्यात येत असून त्यासाठी 48 तास लागतात. त्यानंतरच हॉस्पिटल रुग्णांसाठी सोमवारी खुले करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
या हॉस्पिटलमध्ये थेट प्रवेश दिला जाणार नाही. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयाची लॅब किंवा इतर लॅबमध्ये चाचणी होईल. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही होणार असून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या समोरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये रुग्णाची प्राथमिक तपासणी होईल. त्यानंतरच रुग्णाला कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्यात येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.