जवळा – प्राथमिक आरोग्य केंद्र, नान्नज येथील आरोग्य सहायक अरुण हजारे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम जवळा येथे संपन्न झाला. हजारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व आम्हाला आई-वडिलांप्रमाणे सांभाळले तसेच करोनाच्या कठीण काळात जनतेला प्रामाणिक आरोग्य सेवा दिली, असे गौरवोद्गार तालुका आरोग्य अधिकारी किरण कुमार जाधव यांनी काढले.
यावेळी ज्योती क्रांती सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे, व्हाईस चेअरमन दशरथ हजारे, संचालक मारुती रोडे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जोरे, वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा पालवे, मिनीनाथ शिंदे, डॉ. पूनम वनवे, डॉ. सचिन रेडे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध कर्मचारी व जवळा पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.