सातारा – कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत. एकूण १४० मतांपैकी
बाळासाहेब पाटील यांना ७४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उदयसिंह पाटील उंडाळकर यांना ६६ मते मिळाली.
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली.
येथून बाळासाहेब पाटील हे ७४ इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा८ मतांनी पराभव केला आहे.
बाळासाहेब पाटील हे फक्त सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नव्हे तर महाराष्ट्राचे सहकारमंत्री आहेत. त्यामुळे येथील लढत बाळासाहेबांसाठी अतिशय प्रतिष्ठेची होती. त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेससाठीही तितकीच महत्त्वाची होती.