सातारा – मुंबई येथील कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परिक्षेच्या इंटरमिजिएट विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये शाहूनगर येथील इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमधील आदिती गोपाल गणदास या नववीतील विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत राज्यात 39 वा क्रमांक पटकावला तर भ्ाुमिती-अक्षर लेखन विषयात राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
या परिक्षेसाठी राज्यभरातून एकूण नऊ लाख विदयार्थी बसले होते. इंटरमिजिएट रेखाटन परीक्षेमध्ये गुरूकुल स्कूलचे एकूण 28 विदयार्थी ‘अ’ श्रेणी मध्ये आणि 28 विदयार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. इतक्या मोठया प्रमाणात इंटरमिजिएट परिक्षेत यश संपादन करण्याचा विक्रम गुरूकुल स्कूलच्या विदयार्थ्यांनी केला आहे.
आदितीच्या यशाबद्दल गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी तिचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, सौ. अनुराधा कदम, उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
गुरूकुल स्कूलच्या कला शिक्षिका सोनाली काटकर, सुप्रिया नारकर व प्रसाद चव्हाण यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आनंद गुरव, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, अंबाजी देसाई, जगदीश खंडेलवाल, हरिदास साळुंखे आदींनी अभिनंदन केले.