वाठार स्टेशन – धार्मिक तसेच सामाजिक प्रभोधनाचे अधिष्ठान असलेल्या सोळशी ता.कोरेगाव येथील शैनेश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी प.पु.नंदगिरी महाराज यांना अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम लल्लाच्या मंदिराच्या उद्घाटन महासोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी खास निमंत्रण मिळाले आहे.
हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर उत्तर प्रदेश येथील अयोध्या येथे निर्माण होत आहे श्रीराम लल्लाच्या मंदिर उभारणीसाठी देशभरातील लाखो भाविकांनी देणगी दिली आहे. या महासोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील प्रमुख मंदिरातील मठाधिपती तसेच साधुसंत यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र शिलाण्यास समितीच्या वतीने तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांना अयोध्येतील महासोहळ्याच्या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले आहे.
श्री प्रभू रामचंद्राच्या भव्यदिव्य सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शनि महाराजांच्या कृपेने तसेच परमपूज्य त्यागेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत आहे. मी भाग्यवान आहे तसेच पुण्यवान आहे की एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रम मी माझ्या डोळ्याने बघणार आहे. प्रभु श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमास आपली उपस्थित राहावे, असे आवाहन प. पू.शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी केले आहे.