कराड – ओंड, ता. कराड येथील थोरात मळा परिसरात वीज बिल भरण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिरून वायरमनला दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोपर्डे हवेली, ता. कराड येथील नवनाथ चव्हाण यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम मोहनराव शिंदे रा. ओंड (थोरात मळा) ता. कराड असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
गुरुवार, दि. 21 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ओंड येथील थोरात मळा परिसरात नवनाथ चव्हाण हे वीज बिल वसुलीसाठी गेले असता विक्रम शिंदे यांनी चव्हाण यांची दुचाकी रस्त्यात थांबवत त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच मारहाण करण्याची धमकी दिली, नवनाथ चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दाखल दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.