पुणे – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एप्रिल २०२३ निवडणुकीत सारिका मिलिंद हरगुडे सेवा विकास शेतकरी सोसायटी महिला राखीव मतदार संघातून संचालिका म्हणून निवडुण आल्या होत्या. तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर महिला प्रतिनिधी म्हणून ऑक्टोंबर २०२३ मध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
२० वर्षानंतर तीसऱ्यांदा महिला उपसभापतीपदी सारिका हरगुडेची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती पदाच्या निवडणुकीची मंगळवारी संचालक मंडळाच्या उपस्थित बैठक पार पडली.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सारिका हरगुडे यांची बिनविरोध उपसभापतीपदी निवड झाली. उपसभापती राहूल कंद यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने उपसभापतीचा पदभार हरगडे यांच्याकडे सुपूर्द केला. निवडीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे सभापती दिलीप काळभोर यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.