मुंबई – मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) म्हणून डॉ. स्वप्निल धनराज निला यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी डॉ. शिवराज मानसपुरे हे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. डॉ. स्वप्निल निला हे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा 2011 बॅचचे अधिकारी आहेत. डॉ. स्वप्निल निला यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवी घेतली आहे.
यापूर्वी डॉ. स्वप्निल निला हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्या आधी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. स्वप्निल निला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक (आईसी), भुसावळ विभाग; विभागीय परिचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग; क्षेत्र व्यवस्थापक (एरिया मॅनेजर), भुसावळ विभाग आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ विभाग याठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले आहे.