मुंबई – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपूर आणि त्यांची मुलगी सारा अली खान यांच्यात अवघ्या १३ वर्षांचा फरक आहे. सैफ-करीनाच्या लग्नात साराने खूप एन्जॉय केले, सोशलवर सारा आणि करिनाच्या नात्याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते. साराने अनेकदा सांगितले आहे की ती सावत्र आई करीना कपूरला आपली आई मानत नाही, तिला एक प्रेमळ आई आहे. अशात सारा आणि करीनाचे नाते कसे आहे असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडत असतो.
सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. साराही करीना कपूरला आई म्हणत नाही. साराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिला एक प्रेमळ आई आहे आणि मी करीना कपूरला लहान आई म्हणून हाक मारावी असे सैफलाही वाटत नाही. सारा करिनाला नावाने किंवा के म्हणुन हाक मारते.
साराच नाही तर करीना कपूरचे सैफचा मुलगा इब्राहिम अलीसोबतही चांगले संबंध आहेत. अलीकडेच करण जोहरने एका मुलाखतीत सांगितले की, इब्राहिम रॉकी आणि राणीच्या सेटवर साराशी तासनतास बोलत होता. आता तुम्ही अंदाज लावू शकता की सारा आणि इब्राहिमचे सावत्र आई करीनासोबत चांगला बॉण्ड आहे.
सारा अली खान अनेकदा सैफच्या घरी जात असते. तैमूरचा वाढदिवस असो किंवा जेहची पार्टी, सारा हजेरी लावते. सारा आणि इब्राहिम अनेकदा वडिलांसोबत मस्ती करताना दिसतात. करीना देखील त्यांच्या वैयक्तिक जागेची पूर्ण काळजी घेते आणि त्यांच्यातील शानदार बाँडिंग मजबूत करते.