मुंबई – अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटासह तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चांगलीच चर्चेत असते. नुकताच तिचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच अभिनेता विकी कौशलसोबत झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यानंतर आता सारा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात पोहचली. यावेळी तिच्यासोबत एक खास व्यक्ती असल्याने तिच्या डेटींगची चर्चा सुरू झाली आहे.
गोव्यातील काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिच्यासोबत जेहान हांडा दिसत असल्याने पुन्हा एकदा डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. हे फोटो शेअर करत साराने “गो ग्रीन इन गोवा…” असे कॅप्शन दिले आहे. या दोघांचे गोव्यातील फोटो पाहून पुन्हा एकदा जेहान आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी सारा अली खानचे नाव अभिनेता आर्यन खानसोबत जोडले जात होते. मात्र आता जेहान आणि साराच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु अद्याप या दोघांनी आपल्या नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, जेहान हांडाने ‘केदारनाथ’ या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाचे काम केले आहे. या चित्रपटात सारा अली खान मुख्य अभिनेत्री होती. तेव्हापासून या दोघांची घट्ट मैत्री आहे. लवकरच सारा अली खान ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार असून यात आदित्य रॉय कपूरदेखील काम करणार आहे.