मुंबई – सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची एनर्जी अप्रतिम दिसत आहे, पण ती ज्या पद्धतीने डान्स करत आहे, त्यामुळे आता लोक तिला ट्रोल करत आहेत. साराने आपल्या इंस्टाग्रामवरून एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने बिफोर कॉफी अँड आफ्टर कॉफी या कॅप्शनखाली आपली कलाकारी दाखवली आहे.
व्हिडिओमध्ये सारा अली खान तिच्या हेअर स्टायलिस्टसोबत ‘बाहों में चले आ’ गाण्यावर रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये, जिथे हेअरस्टाइलिस्ट साराचे केस ग्रूम करत आहे, तिथे अभिनेत्री त्याच्यासोबत मनमोहक डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खानने ऑरेंज कलरचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.व्हिडिओच्या पुढच्या भागात, सारा अली खान ‘टिंकू जिया’ गाण्यावर त्याच हेअरस्टायलिस्टसोबत नाचत आहे. सारा अली खानच्या या व्हिडीओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. साराचे बिफोर आफ्टर कॉफी प्रेम पाहून एका युजरने तर थेट ‘किती प्यायलीस’ असा विचारलं आहे.
View this post on Instagram
सारा सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गॅसलाइट’मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता विक्रांत मॅसी आहे. त्याचबरोबर साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सारा अली खान लक्ष्मण उतेकरच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.