मुंबई – अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमधे सर्वांसाठी हिरो होता. रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती. पुष्पाच्या दुसऱ्या पार्टबाबतची महत्वाची अपडेट समोर आली आहे.
लाल चंदनाचा व्यवसाय करणाऱ्या पुष्पा आणि त्याला अडवणाऱ्या भवर सिंहची गोष्ट आता पुढे सरकारणार आहे. पहिल्या पार्टच्या शेवटीच याचा दुसरा पार्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात या दुसऱ्या पार्टमध्ये साऊथची अजून एक अभिनेत्री झळकणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री साई पल्लवी या चित्रपटात एक महत्वाचे पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुनच्या रावडी लूकवर चाहते आधीच फिदा आहेत. त्यात रश्मीकाने त्यात बोल्डचा तडका लगावला होता त्यानंतर आता साई पल्लवीची यात एंट्री झाली तर चित्रपटात आणखी धमाल येईल अशी आशा सर्वांनाच आहे. ऑगस्ट महिन्यात पुष्पाच्या दुसऱ्या पार्टचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु पुष्पाच्या दुसऱ्या पार्टमधे अनेक नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.