“अतरंगी रे’मध्ये सारा अली खान, अक्षय आणि धनुष

अतरंगी रे या आपल्या आगामी सिनेमामध्ये अक्षय कुमार आणि धनुषबरोबर एकत्र काम करणार असल्याचे सारा अली खानने जाहीर केले आहे.


या दोन्ही सुपरस्टारबरोबरचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर साराने पोस्टही केले आहेत. त्यातल्या एका फोटोमध्ये अक्षय आणि धनुष दोघेही साराला एकाच वेळी किस करताना दिसत आहेत.

टॅलेंटेड अक्षय सर आणि अतिशय मृदूभाषी धनुषबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला खूप लकी समजते आहे, असे साराने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आनंद एल. राय यांच्या “अतरंगी रे’ सिनेमाची निर्मिती भूषण कुमारच्या टी-सिरीजकडून केली जाणार आहे आणि हिमांशू शर्माने या सिनेमाची कथा लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

Saat rang ishq ke….aathvaan Atrangi Re ♥️

A post shared by Aanand L Rai (@aanandlrai) on


“अतरंगी रे’चे शुटिंग याच वर्षी 1 मार्चला सुरू होणार आहे आणि तो पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज करण्याचे नियोजन आहे. साराच्या लव्ह आज कलमध्ये सारा आणि कार्तिक आर्यनवरील हां मै गलत हे गाणे नव्याने समाविष्ट केले गेले आहे.

“लव्ह आज कल’ हा 2009 मधील लव्ह आज कल याच नावाच्या सिनेमाचा रिमेक आहे. मूळ सिनेमामध्ये साराचे पप्पा सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.