अभिनेत्री सपना चौधरीला आपल्या चाहत्यांची मने कशी जिंकता हे चांगलेच माहिती आहे. हरियाणाची ही नृत्यांगण जेव्हा स्टेजवर नाचते तेव्हा चाहतेही तिच्यासोबत ठेका धरत असतात. तिचा कोणताही डान्स व्हिडिओ येताच तो सोशल मीडियावर व्हायरल होतो.
सध्या सपना चौधरीचा आणखी एक व्हिडिओ यूट्यूबवर मोठा धमाका करीत आहे. या व्हिडिओमध्ये देसी क्वीन अर्थात सपना चौधरी व्हाईट ड्रेसमध्ये स्टेजवर डान्स करत आहेत. भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटांत धमाल करणाऱ्या सपना चौधरीचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
सपना चौधरीच्या या डान्स व्हिडिओची लोकप्रियता यावरूनच अंदाज बांधता येईल की, आतापर्यंत 5 कोटी 41 लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला आहे आणि यात सातत्याने वाढ होत आहे. तिचा हा व्हिडिओ सोनोटेक रागिनी यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आला आहे.
सपना चौधरीच्या कोणत्याही डान्स व्हिडिओला कोट्यवधी व्यूज मिळत असतात. तसेच तिचे नुकतेच “सुल्फा सररार ठा गया’ हे हरियाणवी गाणे रिलीज झाले होते. हे गाणेही चाहत्यांना खूपच आवडले होते.
दरम्यान, सपना चौधरीने आपल्या करियरची सुरुवात हरियाणतील एका ऑर्केस्ट्रामधून केली होती. त्यानंतर “बिग बॉस-11’मुळे तिला खुपच प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक बॉलीवुड चित्रपटांमध्येही आपल्या डान्सचा जलवा दाखविलेला आहे.