मुंबई – अनेकजण कोकणात सुट्ट्यांचा आनंद घालवण्यासाठी जातात. कोकणातील निसर्गरम्य वातावरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेकजण कोकणात आपल्या गावी गेले आहेत. अशातच अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) देखील कोकणात सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटला आहे. याचे काही व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावरद्वारे संतोष जुवेकर अनेकदा विविध अपडेट देत असतो. सध्या तो कोकणात असून येथील वातावरणात तो मनसोक्त आनंद लुटत आहे. नुकताच त्याने कोकणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओत संतोष जुवेकर मनमोकळेपणाने कोकणात आनंद घेताना दिसत आहे.
याशिवाय त्याने चुलीवरचं जेवण, माश्याच सार आणि भातावर ताव मारल्याचं दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे. संतोषच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर करत संतोष जुवेकरने “कोकण माझं, गाव माझं, खूप काही चोकप झालं होत. माझ्या गावचा माझ्या कोकणाचा दट्ट्या दिला आणि सगळं एकदम मोकळ मोकळ झालं, आता नव्याने भरभरून व्हायला मी मोकळा झालो. पावसात भिजलो, रानात हिंडलो, नदीत पोहोलो आणि चुलीवरचा भात आणि माश्याच सार आणि तुकडी असं अस्सल meditation करून आलो. आता मन आणि शरीर दोनीही Detox झालंय एकदम,’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.