संजू बाबा झाला कॅन्सरमुक्त

मित्र राज बन्सल यांचा दावा

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा सध्या लंग कॅन्सरची झुंज देत आहे. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी तो आपली पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेला होता. दुबईत आपल्या कुटुंबीयांना काही काळ घालविल्यानंतर तो नुकताच मुंबईला परतला आहे.

संजय दत्तवर दोन कीमोथेरेपी करण्यात आल्या आहेत आणि आता कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर तिसरी कीमोथेरेपी करण्यात आले. परंतु, सध्याच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजेच, सर्वांचा लाडका संजू बाबा कॅन्सरमुक्त झाला आहे.

राज बंसल यांनी  पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,’डॉक्टरांच्या हवाल्याने स्वतः संजयने कॅन्सरमुक्त झाल्याचं सांगत खूप खूश असल्याचं सांगितलं. तसेच लवकरच आपल्या आगामी चित्रपटांचं अर्धवट राहिलेलं चित्रिकरण पूर्ण करणार असल्याचंही सांगितलं’

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संजय दत्त अनेक चित्रपटांत झळकणार आहेत. यात शमशेरा, केजीएफ चॅप्टर-2, पृथ्वीराज, भुज ः द प्राइड ऑफ इंडिया आणि तोरबाज आदी चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहेत, तर काही चित्रपटाचे थोडेफार काम बाकी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.