मुंबई – शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर विखारी शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना बांगर हे संजय राऊत यांच्याविषयी बोलत होते. यावेळी बांगर यांनी राऊत यांचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा असा केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. एका वृत्तवाहिनीने संतोष बांगर यांना या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले,”मला वाटतंय संजय राऊत हा पागल झालेला पिसाळलेला कुत्रा आहे.ते जर आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असतील तर ज्या ठिकाणी ते भेटतील त्या ठिकाणी त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बांगर यांनी यावेळी दिला.
काय म्हणाले होते संजय राऊत नेमकं
कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्र्राच्या कानफाटात मारतात अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. तसेच सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी ठोस भूमिका का घेत नाही? असा सवाल देखील उपस्थित केला होता. याच टीकेला उत्तर देताना बांगर यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.