हिंगोली – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले असून शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. असे असताना शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणे यांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना बाजूला करा, राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो अशी थेट धमकी संतोष बांगर यांनी दिली. बांगर यांनी संध्याकाळच्या सुमारास शिवसैनिकांना घेऊन नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेत यात्रा देखील काढली. यावेळी त्यांनी राणेंना खुलं आव्हानही दिले आहे.
एका वृत्तवाहिने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान संतोष बांगर म्हणाले, या हरामखोर नारायण राणेंना मला संदेश द्यायचा आहे, तू काय सांगतो कुठे यायचे. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझे पोलिस प्रोटेक्शन जरा बाजूला कर, हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन जर तुला चारीमुंड्याचीत नाही केले, तुझा कोथळा जर बाहे नाही काढला, तर संतोष बांगर नावं सांगणार नाही. अशी धमकी आमदार बांगर यांनी राणेंना दिली आहे.