पिंपरी – पिंपरी-अजमेरा कॉलनी येथील 2 लाख 5 हजार चौरस फूट इतकी जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला 30 वर्ष कालावधीसाठी दिली जाणार आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे कामगारांना बहुउद्देशीय कला केंद्रासाठी एकत्रित भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपरी-नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून 1992 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला करारनामा करून हस्तांतरीत करण्यात आले. स्टेडियम हस्तांतरणाच्या बदल्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी महापालिका सेवेत समाविष्ट करावे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास एक कोटी रुपये आणि 2 लाख 25 हजार चौरस फूटाचे भूखंड महापालिकेने द्यावे, असा करारनामा करण्यात आला होता. या करारनाम्याची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेल्या 27 वर्षांपासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत होते.
अण्णासाहेब मगर स्टेडियमचे “पीपीपी’ तत्त्वावर पुर्नविकास करणे हे देखील बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करीत न्यायालयीन लढा सुरु करण्याचा इशारा
दिला होता.