सेऊल, दि. 18 – अब्जाधीश सॅमसंग यांचे वंशज ली जे-योंग यांना दक्षिण कोरियातील न्यायालयाने 2016 मधील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडीच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे मोठे आंदोलन उभे राहिले होते आणि याच प्रकरणामुळे दक्षिण कोरियाच्या तत्कालिन अध्यक्षांना पदावरून पायउतार व्हायला लागले होते. \
तत्कालिन अध्यक्षा पार्क ग्युएन हाई अणि त्यांच्या निकटच्या उमेदवारांना लाच देण्याच्या आरोपात ली यांना सेऊलच्या उच्च न्यायालयने दोषी ठरवले. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची सुनावणी नव्याने घेण्यात आली होती. सॅमसंगशी संबंधित दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाला सरकारने पाठिंबा द्यावा. यासाठी ही लाच देण्यात आली होती. या व्यवहारामुळे ली यांची सॅमसंग उद्योग समूहावरील पकड अधिकच घट्ट झाली होती.
संगणकाची चिप्स आणि स्मार्टफोन बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे ली जे-योंग हे उपाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर्रमध्ये शेअर बाजारात कंपनीच्या शेअरच्या किंमतींव अवैधरित्या नियंत्रण मिळवण्याच्या प्रकरणातही त्यांना गोवण्यात आले होते.