Corona Virus Updates: देशात गेल्या 24 तासात 8 महिन्यातील सर्वात कमी मृत्यू

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनामुळे सर्वात कमी म्हणजे 145 जण दगावले आहेत. तथापि हा गेल्या आठ महिन्यातील सर्वात नीचांकी आकडा आहे. गेल्या चोवीस तासात देशात एकूण 13 हजार 788 नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत.

करोना रूग्णांचा आकडा 14 हजारांच्या खाली राहण्याचा गेल्या आठ महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे. दरम्यान आजच्या नवीन करोना रूग्णांमुळे देशातील एकूण करोना रूग्णांची संख्या 1 कोटी 5 लाख 71 हजार 773 इतकी नोंदवली गेली आहे.

यातील 1 कोटी 2 लाख 11 हजार 342 रूग्ण बरे झाले असून रिकव्हरीचा हा रेट 96.59 टक्‍क्‍यांवर गेला आहे. सध्या देशात करोनाचे एकूण सक्रिय रूग्ण 2 लाख 8 हजार 12 इतके आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.