नवी दिल्ली – दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी लवकरच एक दमदार स्मार्ट फोन लाँच करत आहे. Galaxy M31s असे या नवीन फोनचे नाव असून, येत्या 30 जुलैला हा फोन लाँच होणार आहे. त्यामुळे सॅमसंगच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 6,000mAh बॅटरी देण्यात आली असून कंपनीने Exynos 9611 प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंगसाठी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तसेच Galaxy M31s हा अँड्रॉयड10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. भारतात या फोनची किंमत जवळपास 20 हजार रुपये असू शकते.
फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी कंपनीने या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. त्यामुळे हा फोन फोटोग्राफीसाठी उत्तम फोन असणार आहे. Galaxy M31s फोनमध्ये 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज असे दोन ऑप्शन असतील.