‘समृद्धी’ झाली चार बछड्यांची आई ; दोन पांढऱ्या बछड्यांचा समावेश

औरंगाबाद – औरंगाबाद मधील प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ या वाघिणीला चार बछडे झाले आहेत. समृद्धी या वाघिणीने शुक्रवारी रात्री चार बछड्यांना जन्म दिला असून, यातील दोन बछडे हे पांढऱ्या रंगाचे आहेत, तर दोन बछडे हे पिवळ्या रंगाचे आहेत.

महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातील सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून हे बछडे जन्मले आहेत. यापूर्वी या प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या वाघांना देशातील इतर वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच बिबट्यांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला असल्याने, यावेळी खबरदारी म्हणून समृद्धी आणि तिच्या पिलांची काळजी घेण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.