“दबंग 3’मध्ये सलमान आणि सोनाक्षी सिन्हाबरोबर कन्नड अभिनेता सुदीप देखील असणार आहे. सुदीप “दबंग 3’मध्ये व्हिलन साकारतो आहे. या सिनेमातल्या सलमानबरोबरच्या एका ऍक्शन सीनचा फोटो सुदीपने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्या फाईट सीनबद्दलचा किस्साही त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितला. या ऍक्शन सीनमध्ये सुदीपला सलमानच्या छातीवर लाथ मारायची होती.
मात्र सलमानबाबत सुदीपला इतका आदर आहे की त्याला सलमानच्या छातीवर लाथ मारणे अगदी अशक्य झाले. सलमानने या मुद्दयावरून सुदीपची हजेरी घेतली आणि किक मारण्याची स्पष्ट सूचनाही केली. पण तरिही सुदीप सलमानला लाथ मारू शकला नाही. त्यामुळे हा सीन वेगळ्या प्रकारे शूट केला गेला.
या सीनचे शुटिंग संपल्यावर सुदीपला एक गोष्ट जाणवली. कन्नड सिनेमांच्या शुटिंगच्यावेळी त्याचे ज्युनिअर आर्टिस्टही फाईट सीनच्यावेळी सुदीपला लाथ मारण्यास तयार नसतात. जी स्थिती आपली सलमानच्या बाबत झाली, तीच स्थिती आपल्या ज्युनिअर आर्टिस्टची आपल्याबाबत होत असल्याचे सुदीपच्या ध्यानात आले. सलमानबरोबरच्या व्यायामाचे अनुभवही सुदीपने सांगितले आहेत. सलमान अक्षरशः जनावरासारखा व्यायाम करतो, असे तो म्हणाला आहे.