सलमान खान याच्या सुपरहिट सीरीज “दबंग’च्या तिस-या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता “दबंग-3′ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून त्याच्या ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील “नैना लडे’ या रोमांटिक गाण्याचा ऑडियो यापूर्वीच रिलीज करण्यात आला होता, आता त्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.
या गाण्यात सलमान खान आणि सई मांजरेकर यांच्यातील रोमांटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. या चित्रपटात सलमान साकारत असलेल्या चुलबुल पांडे याच्या जीवनाचा फ्लॅशबॅक दाखविण्यात आला आहे. ज्यात त्याची सईसोबत लवस्टोरी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, या गाण्याला जावेद अली यांनी आपला समधुर आवाज दिला आहे. तर साजिद-वाजिद यांचे म्यूझिक लाभले आहे. प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखालील “दबंग-3′ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात सलमानशिवाय सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि सुदीप किच्चा मुख्य भूमिका साकारत आहेत.