निर्भयाच्या न्यायासाठी सायकल रॅली

बारामती ते वीर आणि वीर ते पुन्हा बारामती असा 126 किलोमीटर अंतर सहा तासांत पार

बारामती – बारामती येथील युवकांनी देशातील सर्वच निर्भयाना न्याय मिळावा या उद्देशाने बारामती ते वीर (ता. पुरंदर) आणि वीर ते पुन्हा बारामती असा 126 किलोमीटर अंतर सायकलवर पार केले. अलीकडच्या काळात देशामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा वाढ झाली आहे.

या घटनेतील महिलांना पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा. दोषींना आरोपींना कडक शासन व्हावे, याकरता बारामती तालुक्‍यातील जिव्हाळा सोशल फाउंडेशनच्या युवकांनी अवघ्या सहा तासांमध्ये हा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी महिलांना होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध कडक कायदे व्हावेत, तसेच स्त्रियांबद्दल आदरभाव व्यक्‍त करणारी पोस्टर्स लावली होती ही पोस्टर्स सगळ्यांचे लक्ष वेधत होती.

अनेक ठिकाणी या तरुणाचे गावांमध्ये जल्लोष स्वागत करण्यात आले.या सायकल प्रवासात प्रमोद फरांदे, नितीन तोरवे, अमर राऊत, तानाजी वायशे, सुरेश बोडरे, ज्ञानेश्‍वर काकडे, नानासाहेब बारवकर यांनी सहभाग घेतला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.