कपड्यांवरून सलमानने घेतली रणवीरची फिरकी

नुकताच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळा रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या जोडगोळीने विशेष गाजवला. आयफापुरस्कार सोहळ्यात या दोघांनी परिधान केलेले विचित्र कपडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्याच दरम्यान सलमान खानने रणवीरची त्याच्या विचित्र कपड्यांवरुन फिरकी घेतली.

रणवीरने राखाडी रंगाचा कोट व काळ्या रंगाचे गमबूट घातले होते. या कपड्यांवर त्याने लाल रंगाचा एक कपडा घेतला होता. त्याने परिधान केलेला हा पोशाख पाहून सलमान खानचे हसू आवरले नाही. त्याने रणविरची खिल्ली उडवत चक्‍क त्याच्या कपड्यांनी आपले तोंड पुसले. हा अचंबित करणारा प्रकार पाहून सभागृहातील सर्वच कलाकार जोरजोरात हसू लागले. रणवीरने देखील हसता हसता सलमानच्या विनोद बुद्धीला दाद दिली. तसेच या क्षणाची क्षणचित्रे त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.

रणवीर बरोबरच त्याची पत्नी दीपिका पादुकोण देखील आपल्या विचित्र पक्रारच्या कपड्यांमुळे चर्चेत राहिली. तिने जांभळ्या रंगाचा एक लांबलक पोशाख परिधान केला होता. हा पोशाख इतका लांबलचक होता की रणवीर सिंग त्याला उचलून दीपिकामागे चालत होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×