हरियाणाती भूखंड विकसीत करण्याचा वडेरांचा परवाना रद्द

हरियाणातील शहर नियोजन विभागाच्या संचालकांची माहीती

चंदिगड- रॉबर्ट वडेरा यांच्या स्काय लाईट हॉस्पिटॅलिटीला भूखंड विकसीत करण्यासाठी दिलेला परवाना रद्द करण्याची प्रक्रिया हरियाणा सरकारने सुरू केली आहे. हा परवाना नंतर रियल्टी मेजर डीएलएफकडे 58 कोटी रुपयांत हस्तांतरित केला गेला, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.

हरियाणा शहरी क्षेत्र विकास कायद्यातील तरतुदींनुसार हा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया औपचारिकपणे पूर्ण केली गेली आहे, असे राज्याचे नगर व देश नियोजन विभागाचे संचालक के. एम. पांडुरंग यांनी सांगितले. नोटीसा बजावून सुनावणीची संधीही दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला रद्दबातल प्रक्रियेचे औपचारिक अनुसरण करावे लागेल आणि त्यानुसार औपचारिकता पूर्ण झाली आहे. त्यातून ठोस निष्कर्श निघाला असून आता, आम्हाला निर्णय घ्यावा लागेल,असे ते म्हणाले.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांनी 2012 मध्ये स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ यांच्यातील जमीन कराराचे बदल रद्द केला. त्यामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले होते. या परवान्याचे नुतनीकरण केले गेले नसल्यामुळे परवाना रद्द होणार असल्याचे वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी वर्षभरापूर्वीच स्पष्ट केले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×