सलमानची भाची आणि सनी देओलचा धाकटा मुलगा करणार पदार्पण

सलमान खानची भाची अलिजे अग्निहोत्री आणि सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल लवकरच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा या दोघांसाठीही पदार्पणाचा सिनेमा असणार आहे. अलिजे अग्निहोत्रीला बॉलीवूडमध्ये लॉंच करण्याची जबाबदारी सूरज बडजात्यांनी घेतली आहे. राजश्री बॅनरखाली बनणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या करणार आहे. 

अवनीश बडजात्याच्या सिनेमात जावेद जाफरीचा मुलगा, ओकाम जाफरी लीड रोल करणार असल्याचे समजले होते. मात्र राजश्री बॅनरने सनी देओलच्या धाकट्या मुलाला हा रोल देण्याचे निश्‍चित केले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी राजवीर गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी करत होता. त्याला आता ही संधी मिळाली आहे. सनीने “पल पल दिल के पास’मधून मोठा मुलगा करण देओलला फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरवले आहे. आता धाकट्या मुलाची बॉलीवूड पदार्पणाची पाळी आली आहे. ही एक रोमॅंटिक कॉमेडी फिल्म असणार आहे. “ये जवानी ही दीवानी’ च्या स्टाईलची या सिनेमाची धाटणी असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.