मुंबई – बॉलिवूड अभिनेता सनी देओलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच त्याचा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. गदरला मोठे यश मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा दूसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पाहावे लागणार आहे. मात्र यातच आता सनी देओलाचा धाकटा मुलगा राजवीर देओल चर्चेत आला आहे. वडिलांप्रमाणे त्याच्या मुलानेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
राजवीर देओल लवकरच ‘दोनो’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ठाकेरिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजश्री प्रॉडक्शनमधून हे दोघेही आपल्या करिअरची सुरुवात करणार आहेत. या चित्रपटात या दोघांचीही जोडी कमाल दिसत आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी राजवीर गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी करत होता. त्याला आता ही संधी मिळाली आहे. सनीने ‘पल पल दिल के पास’मधून मोठा मुलगा करण देओलला फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरवले आहे. त्यानंतर आता राजवीर ‘दोनो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 25 जुलै रोजी ‘दोनो’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.